शिरोळ तालुका प्रतिनिधी - रोहित जाधव
जयसिंगपूर नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरे व गुंडाप्पा पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर सामाजिक कार्यकर्ते सागर आडगाणे व हाजी मुसा डांगे यांची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली आहे.
![]() |
चला रक्तदान करून देश सेवा करू |
जयसिंगपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व पक्षप्रतोद संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षि शाहू आघाडीची सत्ता आहे. प्रमुख नेत्यांच्या व सर्व नगरसेवकांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेे दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीची घोषणा होताच पालिकेच्यासमोर डांगे आणि आडगाणे समर्थकांनी फटाक्यांची ढोल-ताशांचे गजरात आतिशबाजी करीत जल्लोष केला. तळागाळातील कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाचे संधी दिल्याने व पक्षप्रतोद संजय पाटील यड्रावकर त्यांच्यावरील विश्वास अधिकच दृढ झाला. येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राजश्री शाहू विकास आघाडी भरघोस मतांनी विजयी होईल असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
सदर बैठकीचे प्रास्ताविक माजी रोटेरियन रुस्तुम भाई मुजावर यांनी केले. या निवड प्रक्रियेदरम्यान दोन्ही आघाडीचेे नगरसेवक ,नगरसेविका, मंडळाचे माजी सभापती तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे,अशोकराव कोळेकर,नंदकुमार बलदवा,आदम मुजावर,दादासो चिंचवाडकर ,संभाजी मोरे, अर्जुन देशमुख आदी उपस्थित होते.
यांची निवड अल्प कालावधीसाठी असली तरी खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला नगरसेवक पदाची संधी दिली याबद्दल सर्वत्र आनंद होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा