Breaking

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

कोथळीच्या मंगेश विद्यामंदिर शाळेत मातोश्रीचे अध्यक्ष श्री.जीवन व सौ.श्रेया आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण व मुलांना खाद्य किटचे वाटप



गीता चिगरे : सहसंपादक


कोथळी :  मंगेशनगर विद्यामंदिर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मातोश्री सोशल फाउंडेशन अध्यक्ष जीवन आवळे व त्यांच्या पत्नी सौ.श्रेया जीवन आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

      15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन व सौ.श्रेया जीवन आवळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री सोशल फाउंडेशनकडून शाळेतील मुलांना खाद्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मातोश्रीचे अध्यक्ष जीवन आवळे यांनी मराठी माध्यम शाळांमध्ये सर्व गरीब गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात आपण ही मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन पुढे आलो आहोत, याचीच एक जाण ठेवून गरीब मुलांना एक सुंदर असे खाद्याचे कीट देऊन स्वातंत्र्य दिनादिवशी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इथून पुढे शाळेतील प्रत्येक कार्यक्रमा मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिली आहे.

     सदर मातोश्रीकडून मुलांना एक सुंदर किट दिल्याबद्दल व विद्यार्थीभिमुख उपक्रमाचे कौतुक करून मनस्वी आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री. कैलास राठोर यांनी मानले.

        सदर कार्यक्रमास मातोश्री सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष अमोल बरकडे ,सचिव सुशांत चूडाप्पा, खजिनदार रमेश घाटगे, सदस्य अर्जुनसिंग राजपूत, सदस्य उमेश पवार, गौरव गांजे, निखिल नंदीवाले, रोहन पाटोळे, सुनिल आवळे, संदीप मोरे, सौ. मिणचे मॅडम, सौ.कांबळे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा