प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
* शिरोळ रोटरी क्लबकडून शिलाई मशीन व सायकल वाटप कार्यक्रम संपन्न :
शिरोळ – समाजासाठी काम करणा-या मोजक्या संस्था आहेत. त्यामध्ये रोटरी क्लब आहे. गरजूंना शिलाई मशीन व सायकल वाटप हा उपक्रम कौतुकास्पद असून रोटरी क्लब ऑफ शिरोळ संस्थेला प्रशासनाकडून सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी केले.
शिरोळ येथे पंचायत समिती कार्यालयासमोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त लेडीज सायकल व शिलाई मशीन वाटप कार्यक्रम पार पडला. गटविकास अधिकारी शंकर कवितके, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, रोटरीचे डिस्ट्रीक सेक्रेटरी अरुण भंडारे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती दिपाली परीट होत्या. यावेळी विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या विद्यार्थीनींचा देखील सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक करून रोटरीचे अध्यक्ष दिपक ढवळे म्हणाले, गेल्या अकरा वर्षापासून रोटरीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. येणा-या काळात देखील शैक्षणिक, आरोग्य या उपक्रमाबरोबरच अनेक उपक्रमाची परंपरा अशीच पुढे सुरु राहणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रोटरीच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी डॉ. विरश्री पाटील, डॉ. अमेय माने, डॉ बन्ने, डॉ.अनिरुध्द सुतार,पद्माराजे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक गंगधर, राजू प्रधान यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास रोटरीचे भाऊसो नाईक, रुस्तम मुजावर, पं. स. उपसभापती राजगोंडा पाटील, सचिन शिंदे,अविनाश टारे, श्रीकांत शिरगुप्पे, , नितीन शेट्टी ,शरद चुडमुंगे,बापूसो गंगधर, प्रताप देसाई ,विठठ्ल पाटील,विजयकुमार माळी, मोहन माने,चितामणी गोंदकर,संदीप बावचे,सुनिल बागडी यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते. सुत्रसंचालन किरण पाटील व संतोष काळे यांनी केले. रोटरीचे सचिव सचिन देशमुख यांनी आभार मानले.
👉🏼– मेडिकल असोसिएशनला सभागृह उपलब्ध
शिरोळ शहर मेडिकल असोसिएशनची बैठक व इतर कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ शिरोळकडून विनामोबदला सभागृह देण्याची घोषणा रोटरीचे अध्यक्ष दिपक ढवळे यांनी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा