Breaking

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

*शिरोळ येथे जागेच्या वादातून दोन गटात जबर हाणामारी दोघांवर- गुन्हा दाखल*



 प्रविणकुमार माने : उपसंपादक


शिरोळ जि.कोल्हापूर येथे जमिनीच्या वादातून भीषण हाणामारी झाली असून त्यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. विश्वास शंकर दबडे , संजय माने आणि नरेश माने सर्व रा.शिरोळ अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

     याबाबत अधिक माहिती अशी की,विश्वास शंकर दबडे आणि आरोपी 1)दत्तात्रय माने व 2)ओंकार माने हे एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांचेमध्ये जमीन प्लॉट नं. 1532/1 बाबत वाद असून मे दिवाणी कोर्टात फिर्यादीचे बाजूने निकाल झाला आहे. त्यामुळे फिर्यादी हे सदर प्लॉटवर बांधकाम करीत असून त्या दोन कुटुंबांमध्ये खिडकी व छपराचे बांधकाम करणेचे कारणावरून  वाद आहेत.दि  05/08/2021 रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास सदर फिर्यादी विश्वास शंकर दबडे हे  सदर प्लॉटवरील बांधकामाची पाहणी करीत असताना आरोपी दत्तात्रय माने  व ओंकार दत्तात्रय माने यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तर आरोपी नं 01 याने त्यांच्या जवळ असलेल्या चाकूने फिर्यादी यांचे डाव्या हाताच्या बोटावर, कोपऱ्यावर, छातीवर मारून, यामध्ये जखमी संजय माने यांचे डाव्या बाजूला व कंबरेवर तसेच जखमी नरेश माने यांच्या डाव्या हाताचे दंडावर मारून त्यांना गंभीर जखमी केले आहे. तसेच आरोपी नं 02 ओंकार दत्तात्रय माने याने फिर्यादी व संजय माने यास लाथा बुक्कयांनी मारहाण करून धमकी दिलेने फिर्यादी यांनी त्यांचेविरूदध शिरोळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता मा पो. हे.काॅ. धुमाळ साहेबांनी आरोपीविरूद्ध आय.पी.सी.अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर  गुन्ह्याचे कामी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास हा पो.हे.काॅ. सानप साहेब करीत आहेत. शिरोळ शहरात अशा प्रकारच्या प्रकरणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा