प्रविणकुमार माने : उपसंपादक
शिरोळ येथे जमीनीच्या वादातून भीषण हाणामारी झाली असून त्यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुका. शिरोळ जि कोल्हापूर येथील फिर्यादी ओंकार दत्तात्रय माने व.व.21 रा.लक्ष्मीनगर,शिरोळ व आरोपी 1)विश्वास शंकर दबडे 2)नरेश संजय माने 3)संजय दरगू माने आणि 4)हरिश संजय माने सर्व रा.शिरोळ हे एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यामध्ये जमीन प्लॉट नं 1532 वरून मे.दिवाणी कोर्टात दावा सुरू आहे. यातील आरोपी नं 01 हा
बांधकाम करत असून फिर्यादी यांचे जनावरांचे गोठयापासून 03 फूट अंतरावर खिडकी करणेचे कारणावरून त्यांचेत वाद आहेत.अशी परिस्थिती असता दि 05/08/2021 रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास प्लॉट नंबर 1532 या प्लॉटवर नगरपरिषदेचे संबंधित कर्मचारी व दत्तात्रय दरगू माने हे मापे घेत असताना वर नमूद आरोपींनी संगनमत करुन मापे मान्य नसलेचे बोलून अश्लील शिवीगाळ करून फिर्यादी यांना बघून घेतो अशी धमकी देऊन लाथा बुक्कयांनी मारहाण केली. तर आरोपी नं 2 याने त्याच्या हातातील येळवाच्या काठीने ओंकार दत्तात्रय माने व दत्तात्रय दरगू माने यांचे डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले आहेत. त्यानंतर ओंकार दत्तात्रय माने याने शिरोळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीस हे.काॅ.धुमाळ साहेबांनी आरोपींचे विरूदध आय पी सी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.सदर गुन्हयात वापरलेली येळवाची काठी जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास हा मा पो.ना.पाटील साहेब करीत आहेत.
या घटनेने शिरोळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा