जयसिंगपूर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रम अर्थात १५ ऑगस्ट दिनी ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, सचिव डॉ.सुभाष अक्कोळे व नूतन प्राचार्य डॉ.सुरत मांजरे हे उपस्थित होते.
संस्थेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम जयसिंगपूर कॉलेजच्या प्रशस्त प्रांगणात संपन्न झाला. सुरुवातीस ध्वजारोहण करीत तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रगीत गायले गेले. यानंतर उपस्थित असणाऱ्या घटकासमोर आपलं मनोगत व्यक्त करताना कार्यशील नूतन प्राचार्य डॉ.सुरत मांजरे म्हणाले, आज देश कोरोना महामारीच्या महाकाय संकटात जात असताना आपण सर्व देशवासीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरा करीत आहोत. यावेळी त्यांनी देशाच्या सामाजिक व शैक्षणिक बदलाचा आढावा घेतला. जागतिक महापटलावर देशाला अव्वल स्थान प्राप्त करून द्यावयाचे असेल तसेच खऱ्या अर्थाने शैक्षणिक स्वातंत्र्य प्राप्त करावयाचे असेल तर त्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपल्या सर्वांना ज्ञानरूपी महासागरात बुडून आपण ज्ञानवान व ज्ञानदाते बनले पाहिजे. तसेच आपल्या कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख वाढता असून तो टिकवणे व वाढवणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य व नैतिक जबाबदारी आहे. आगामी NAAC समितीला आपणास हसतमुखाने सामोरे जायचं आहे अशा प्रकारचा सकारात्मक विश्वास त्यांनी या निमित्ताने दिला.
यानंतर संस्थेचे सचिव व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.सुभाष अक्कोळे यांनी स्वातंत्र्याबाबत चौफेर मांडणी करताना ते म्हणाले, ध्वजारोहणाच्या वेळेस ध्वजेचे पूजन करणे,फुले वाहणे व नारळ वाढवणे या सर्व गोष्टी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहेत. त्यामुळे इथून पुढे आपण या गोष्टीबाबत योग्य ती दक्षता बाळगावी असे सांगितले. भारतीय संविधान टिकवायचं असेल तर केंद्र शासनाच्या प्रोटोकॉल प्रमाणे ध्वजारोहन करताना ध्वजवंदन व ध्वजगीत गाणे या गोष्टी खूप महत्त्वाचे आहेत असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
या प्रजासत्ताक दिनी महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे खजिनदार पद्माकर पाटील, अशोक शिरगुप्पे,डॉ. शितल पाटील,अशोक मादनाईक, शशांक इंगळे, अभिजीत अडदंडे व सर्व उपप्राचार्य, कार्यालयीन अधिक्षक संजीव मगदूम, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, अनेकांत स्कूलचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ, कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रभाकर माने ,एनसीसी कॅडेट्स व एनएसएसचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मात्र प्रशासनाच्या कोरोना नियमांना अधीन राहून हा कार्यक्रम आनंदात पार पडला. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.बाळगोंडा पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा