रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी
नांदणी येथे पुन्हा एकदा नव्या जोमाने व नव्या "महाराष्ट्र सैनिकांच्या" पुढाकाऱ्याने 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' पक्षाची पुन्हा एकदा नव्याने सुरवात करून "नामफलकाचे उद्घाटन" व "शेकडो तरुणांचा पक्ष प्रवेश" सोहळा जिल्हा उपाध्यक्ष भगवंत (दादा) जांभळे,मनवासे जिल्हा संघटक संजय (आबा) भंडारे,तालुकाध्यक्ष कुमार पुदाले यांच्या हस्ते व तालुका सचिव श्रीकांत सुतार,माजी तालुकाध्यक्ष कुबेर मगदूम,जयसिंगपुर शहराध्यक्ष निलेश भिसे,मनविसे तालुकाध्यक्ष सुशांत पाटील,जयसिंगपुर शहर सचिव सुरज बुरांडे, उपाध्यक्ष अमित पाटील,मनवासे शहराध्यक्ष किरण चव्हाण,अकिवाट सोशल मीडिया अध्यक्ष असलम मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांनी येत्या काही महिन्यात मनसेची तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा स्थापन करून "गाव तिथे शाखा व घर तिथे महाराष्ट्र सैनिक" हि संकल्पना घेऊन त्याची सुरवात आज स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून नांदणी येथून सुरू करीत असलेचे सांगून मनसे पक्षाच्या वतीने तालुक्यातील अनेक गावांत पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व आरोग्य शिबीर राबविण्याचे हे कार्य एकमेव राजकिय पक्षाने केलेचे सांगितले.
जांभळे पुढे म्हणाले की, शिवरायांना अभिप्रेत असणार व राजसाहेब ठाकरे यांच्या दुरदृष्टीतील "जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र" घडवण्यासाठी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करून मनसे पक्ष व महाराष्ट्र सैनिक तळागाळातील लोकांच्या अडीअडचण व संकटकाळी पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असे सांगितले.
नांदणी जिल्हा परिषद विभागासाठी विभागध्यक्ष म्हणून भास्कर कोळी तर नांदणी शाखाध्यक्ष सुकुमार आंबी व शाखा उपाध्यक्ष हर्षद पोवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या समारंभास शुभम आरगे, सौरभ पोवार, प्रतीक कराळे, प्रज्वल सेवेकरी, अभिजीत कोडोले, अभिषेक माने, आदित्य रोडे, अभिजीत मोरे, गिरीश मुडशी,प्रणव अंबी,प्रसाद क्षीरसागर आदी महाराष्ट्र सैनिक , नागरिक,पत्रकार बांधव उपस्थित होते.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा