Breaking

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

समाजवादी प्रबोधिनी व शिरोळ तालुका पुरोगामी मंचच्या वतीने साहित्यसम्राट व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन व विचारांचा जागर


समाजवादी प्रबोधिनी जयसिंगपूर


रोहित जाधव: शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी


  समाजवादी प्रबोधिनी जयसिंगपूर व शिरोळ तालुका पुरोगामी मंचच्या वतीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील खंदे नेते, पुरोगामी साहित्यिक आणि लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा घेणेत आली.

        जयसिंगपूरचे प्रसिद्ध धन्वंतरी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.चिदानंद आवळेकर व डॉ.महावीर अक्कोळे यांनी  अण्णाभाऊच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.अतीक पटेल यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या विचार आणि कार्याची महत्व सांगून नव्या पिढी समोर त्यांचे साहित्य पोहोचवणे महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. यानिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

    यावेळी शाहीर रफिक पटेल यांनी  आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित जोशपूर्ण गाण्याचे सादरीकरण करून आदरांजली वाहिली.यावेळी चळवळीतील अग्रणीय मान्यवर प्र.प्राचार्य प्रा.डॉ.यशवंत चव्हाण, प्रा.शांतारामबापू कांबळे, कॉ.रघुनाथ देशिंगे, प्रा.डॉ.सुनील बनसोडे,प्रा.डॉ. तुषार घाटगे, खंडेराव हेरवाडे,सचेतन बनसोडे,संजय गुरव व पत्रकार संजय सुतार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन बाबासाहेब नदाफ यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा