Breaking

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

*डॉ. प्रसाद माने यांनी मुलगाच्या वाढदिवसानिमित्त आई वृध्दाश्रमास केली ५००० रूपयांची मदत...*


डॉ.प्रसाद माने व परिवाराकडून आर्थिक मदत


सोंदर्या पोवार : जयसिंगपूर प्रतिनिधी


   आमच्या आई वृध्दाश्रमाचे आश्रयदाते आणि विश्वस्त मंडळाचे सदस्य मा.डॉ.प्रसाद माने( एम.डी. मेडिसीन ) यांनी आपला मुलगा ओम याचा ४ था वाढदिवस आई वृध्दाश्रमातील अनाथ व निराधार वृध्दांच्या समवेत केक कापून साजरा केला. 


            यावेळी आई वृद्धाश्रमातील सर्व आज्यांना नवीन साड्या आणि गाऊनचे वाटप मुलगा ओम आणि मुलगी वेदिका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर माने यांनी शाल व श्रीफळ देऊन माझा सत्कार केला. रोख स्वरूपात ५००० हजार रूपयांची मदत केली.  तर डाॅ.सौ.अश्विनी प्रसाद माने मॅडम यांनी माझ्या पत्नी निलीमा आणि हेमा यांना साड्या देऊन त्यांचा सुध्दा सन्मान केला. ओमचे औक्षण करून सर्व आज्यांनी त्याला वाढ दिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. यावेळी डॉक्टर साहेबांच्या मातोश्री आणि दोन आत्या उपस्थित होत्या. त्यांनी सुध्दा आमच्या कार्याचे कौतुक केले. 

     डॉ. प्रसाद माने साहेब आपल्या घरातील सर्वच लहान, थोरांचे वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत आई वृध्दाश्रमातच साजरे करत असतात , आणि आई वृध्दाश्रमास रोख स्वरूपात मदत करून आई वृध्दाश्रमातील अनाथ, निराधार वृध्दांना आपल्या आनंदात सामिल करून घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.

    डॉक्टर माने कुंटूंबियांनी एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला असून त्यांचा आदर्श समाजाने सुध्दा घेऊन अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपले वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरे करून वृध्दाश्रमातील अनाथ व निराधार वृध्दांना आपल्या आनंदात सामिल करून घ्यावे अशी भावना व विनंती संजय भोसले यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा