![]() |
विविध संघटनांनी देशव्यापी आंदोलनाला दिला पाठिंबा |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी 20 लाख शेतकरी व मजूर आज अखेर 10 महिने दीर्घ आंदोलन करीत आहेत.या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यामुळे हे सर्व घटक उध्वस्त होणार असून त्याचे प्रतिकूल परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्था व जनतेवर होणार आहे.केंद्र सरकार शेतकरी, कामगार व संपूर्ण जनता गुलामगिरीत कशी राहील याची व्यवस्था तयार करीत आहेत. प्रदीर्घ चाललेल्या या आंदोलनामध्ये सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. हम करे सो कायदा या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती असून या कृषी व कामगार विरोधी कायद्याबाबत सरकार निष्क्रिय आहे. त्यामुळे आज जयसिंगपूर येथे सकाळी १०.३० वाजता गाव चावडी कार्यालया समोरून सर्व संघटना एकत्रित येऊन गांधी चौक मार्ग ते क्रांती चौक असा भव्य मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकात आल्यानंतर निदर्शने करीत प्रचंड मोठ्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
![]() |
विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली |
या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.महावीर अक्कोळे, प्रा.शांताराम कांबळे, राष्ट्रीय काँग्रेसचे सुभाष भोजणे,सदाशिव पोपळकर, बाबासाहेब नदाफ, कॉम्रेड रघुनाथ देशिंगे,प्रा.डॉ.गजानन चव्हाण व प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी सरकारच्या निष्क्रियपणावर चौफेर टीका करीत सरकारने कृषी व कामगार विरोधी कायदे मागे घेऊन कामगार व तमाम शेतकरी वर्गाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी ही करण्यात आली. तसेच जोपर्यंत हे कायदे रद्दबातल केली जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सातत्याने चालू राहणार असल्याचा निर्धार करण्यात आला.दिल्लीत सुरू असलेले हे आंदोलन भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन असल्याची चर्चा ही करण्यात आली. सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणात विरोधी ही टीका करण्यात आली. या मोर्चाच्या शेवटी शेतकरी व कामगार यांचा सन्मान करीत प्रेरणादायी गाण्यांचं गायन करण्यात आले.
लाल बावटा कामगार युनियन, राष्ट्रसेवा दल, शिरोळ तालुका पुरोगामी संघटना, समाजवादी प्रबोधिनी जयसिंगपूर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शेतकरी संघटना,शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना(सुटा), गोकुळ कामगार संघटना, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना व राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अमरसिंह निकम,बंडा मिनियार,प्रा.प्रकाश मेटकर,डॉ.अतिक पटेल,डॉ.तुषार घाटगे,प्रा.ए.एस.पाटील,अशोक शिरगुप्पे,डॉ.महादेव सुर्यवंशी ,डॉ.दिपक सुर्यवंशी,डॉ.नितीश सावंत,प्रा.रविंद्र काकरंबे,संदीप लाटकर, मारुती जाधव, प्रदीप साळुंखे, आदम मुजावर, शाहीर शब्बीर पटेल, खंडेराव हेरवाडे ,कॉम्रेड फुलाबाई बेडगे, सुनीता पवार, वत्सला कोळी,हणमंत पुजारी, भगवान कांबळे,पत्रकार रोहित जाधव आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
या मोर्चाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सीनियर नागरिकांनी ही आपली सहभाग नोंदविला. तसेच शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना(सुटा)ने या देशव्यापी बंदला पाठिंबा दिल्याने जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर, घोडावत कन्या जयसिंगपूर व एस.के.पाटील महाविद्यालय कुरुंदवाड येथील प्राध्यापकानी सक्रिय सहभाग घेतला होता.
जयसिंगपूरमध्ये विविध मागण्यांसाठी मोर्चे व आंदोलने होत असतात मात्र या आंदोलन व देशव्यापी संपामध्ये असंख्य संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा