![]() |
गॅस स्फोटाने विस्कटलेले घरगुती सामान |
*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापूर शहरांमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटाने दुर्देवी घटना घडली आहे.कोल्हापुरातील राजारामपुरी भागातील टाकाळा येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात दोघेजण जखमी झाले आहेत.
आज सकाळी झालेल्या या स्फोटामुळे घराचे मोठे नुकसान झाले असून दोघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस गळतीमुळं हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेली माहिती अशी की ,टाकाळा येथील मैनुद्दिन जमादार यांच्या घरात सकाळी घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतकी भीषण होता की घराच्या छताचा बाग कुटुंबातील दोघांच्या अंगावर कोसळला. तसंच या स्फोटात त्यांच्या भिंतीला तडे गेले. याशिवाय घरातील संसारोपयोगी साहित्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटात मैनुद्दिन जमादार व नियाज जमादार असे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटाची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिका अग्निशामक दलाचे जवान तातडीने तेथे पोहोचले. त्यांनी जखमींना बाहेर काढले. स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा असल्यामुळे शेजारील अनेक जण मदतीसाठी धावून आले. या आवाजामुळे भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या दुर्दैवी घटनेने मुजावर कुटुंबियांबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा