Breaking

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

हातकणंगले व परिसरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले; अवैध देशी-विदेशी मद्यविक्री करणाऱ्यास केली अटक

 

बेकायदेशीर देशी-विदेशी मद्य विक्री साठ्यासह संशयित आरोपी


प्रविणकुमार माने : उपसंपादक


    कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले शहर परिसरात एकजण अवैध देशी- विदेशी मद्यविक्री करत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने यांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथकाने कारवाई करत हातकणंगले शहर परिसरात अवैधरित्या मद्यविक्री  करणाऱ्या संशयित आरोपी राजकुमार अशोक काटकर वय वर्ष 35  रा. मुजावर गल्ली ,रेल्वे स्टेशन समोर हातकणंगले  यांच्यावर कारवाई करून एक लाख 34 हजार किमतीचा देशी विदेशी मद्याचा साठा व वाहन एक असा 1लाख 61 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी घाटकर यांच्याविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.


पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने

    या कारवाईत पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मा.कुरणे,शेखर कोळी, संदिप बांडे ,नीलेश भोसले व  विजय भांगरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

       या कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने यांच्याबरोबर या कामी कार्य करणाऱ्या हातकणंगले पोलिस ठाण्याच्या सर्व स्थानिक गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा