Breaking

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

किरीट सोमय्यानी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात केली तक्रार दाखल, कारवाई न केल्यास कोर्टात दाद मागणार

Photo source - zee news



कोल्हापूर :  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर भाजप नेते किरिट सोमय्या यांनी दोन साखर कारखान्या मध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.  सोमय्या यांनी कोल्हापूरमधल्या मुरगूड पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली आहे.


किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीत हसन मुश्रीफ, त्यांच्या पत्नी शाहिरा हसन मुश्रीफ, नाविद मुश्रीफ, आबीद मुश्रीफ यांच्यासह विविध कंपन्यांचे संचालक, बेहिशेबी मालमत्ता गुंतवणूक करणारे चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया, महेश गुरव यांची नावं आहेत. या सर्वांच्या विरोधात 120, 420, 468, 471 आणइ 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात यावा असं म्हटलं आहे. 


पोलिसांनी सात दिवसांच्या आत एफआयआर रजिस्टर केला नाही तर आपण वरच्या कोर्टात जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसंच पोलिसांनी हसन मुश्रीफ आणि कुटुंबावर कारवाई करावी अशी मागणी केल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.


किरिट सोमय्या यांचा आरोप

कागलमधील सर सेनापती साखर कारखाना व आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा