सौजन्य :zee24.com |
पुणे : अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैगिंक छळ करून तिच्याशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या शिक्षकाला न्यायालयाने पॉक्सो कायद्यांतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.आर नावंदर यांनी निकाल दिला. निवृत्ती देवराम काळभोर (वय 53 रा. औंदुंबर निवास, चिंचवड) असे शिक्षा सुनावलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ही घटना ऑक्टोबर 2018 व त्यापूर्वी घडली होती. संबंधित मुलगी काळभोर यांच्या शाळेतील केबिनमध्ये संरक्षण शास्त्राचा व्यवसाय कधी जमा करायचा आहे? असे विचारण्यासाठी गेली होती. तेव्हा आरोपीने तिला 'तू महिना अखेरीला एकटी येऊन भेट, मी जमा करून घेतो तसेच त्यापूर्वी हा आरोपी पीडितेला 'तुला पैशांची गरज आहे का? फिरायला जायचे का? , तू माझ्यावर प्रेम करतेस का? माझ्याशी लग्न करतेस का? असे बोलला होता.
त्यावर 'तुम्ही माझे सर आहात असे ती म्हणाली, तेव्हा त्याने उत्तर दिले की विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये प्रेम होत नाही का? असे बोलून आरोपीने पीडितेचा हात धरला आणि तिला थांबायला सांगितले. परंतु पीडितेने ओरडण्याची धमकी दिल्यावर आरोपीने तिचा हात सोडला. त्यानंतर पीडितेने निगडी पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध फिर्याद दिली व आरोपीवर गुन्हा दाखल झाला.
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी पाहिले.सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपीला सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली.तसेच आरोपीकडून वसूल झालेली दंडाची ५० हजार रूपयांची रक्कम नुकसान भरपाई म्हणून पीडितेला देण्याचा न्यायालयाने (Pune Court) दिला.
दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे.
शिक्षक पेशाला काळिमा फासणाऱ्या या विकृत शिक्षकाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा