![]() |
जयसिंगपूर गुन्हे शोध पथक व दुचाकी चोरटे |
प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर पोलीस ठाणे गु.र.नं ३५३/२०२१ भादविस कलम ३७९ मधील मोटारसायकल चोरीतील आरोपींना पकडण्यास जयसिंगपूर गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे.
आरोपीकडुन ०५ मोटारसायकली व गुन्हयात वापरलेल्या २ मोटारसायकल असा एकुण २,२०,०००/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जयसिंगपूर पोलीस ठाणे गु.र.नं ३५३/२०२१ भादविस कलम ३७९ प्रमाणे दि. १५/०९/२०२१ रोजी गुन्हा दाखल करणेत आला होता. जयसिंगपूर गुन्हे शोध पथकातील अमंलदार हे सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हददीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना संशयित गुन्हेगार १) प्रताप संजय माने वय २७ रा. दानोळी ता.शिरोळ २) तुषार रावसो तेरदाळे वय २४ रा.कोथळी ता.शिरोळ ३) ऋतीक नितीन इंगवले वय १९ रा. दानोळी ता. शिरोळ ४) वकील संजय वळकुंजे वय २१ रा दानोळी ता.शिरोळ असे क्रांती चौक जयसिंगपूर याठिकाणी संशयितपणे फिरताना मिळून आले.
त्यांना ताबेत घेवून त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांनी जयसिंगपूर तसेच इतर ठिकाणच्या मोटारसायकली चोरी केलेची कबुली दिली. सदर आरोपीकडुन ०५ मोटारसायकली व गुन्हयात वापरलेल्या २ मोटारसायकली असा एकुण २,२०,०००/- किंमतीचा मुददेमाल मिळुन आला असुन तो हस्तगत करणेत आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री शैलेश बलकवडे सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री गायकवाड सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग श्री रामेश्वर वैजणे सो, मा.पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र मस्के जयसिंगपूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलीस ठाणे कडील पो.ना. ५६७ सागर सुर्यवंशी,मपोना ४९३ अजंना बन्ने, पो.कॉ.८८५ संदेश शेटे, पो.कॉ. २३८५ अमोल अवघडे, पो.काँ. १३३३ रोहित डावाळे, पो.कॉ. २४२८ शशिकांत भोसले, पोका २५४५ वैभव सुर्यवंशी यांनी केली आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने केलेले काम कौतुकास्पद आहे अशा प्रकारची चर्चा सर्वत्र होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा