![]() |
शेतकरी रामगोंडा पाटील |
ऊस हंगाम सुरू करण्याच्या हालचाली सुरू होताच एकरकमी एफआरपी देण्याची शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत रणशिंग फुंकले आहे. यातच कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावचे शेतकरी रामगोंडा पाटील यांनी राजू शेट्टी वगळता कोणी एकरकमी एफआरपी मिळवून दिल्यास एक एकर जमीन बक्षीस देण्याची तयारी दाखवत इतर संघटनांना आव्हान दिले आहे.
इतर शेतकरी संघटना व नेत्यांना आव्हान देताना रामगोंडा पाटील म्हणतात की, राजू शेट्टी यांच्यावर टीका करण्यापेक्षा एफआरपी विरोधात रस्त्यावर लढाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. व असे केल्यास आपल्या १८ एकर शेतीपैकी एक एकर बक्षीस देण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
तसेच एकरकमी एफआरपी मिळवून देण्याची ताकद फक्त राजू शेट्टी यांच्यातच आहे आणि तेच मिळवून देतील असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा