Breaking

सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

*कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदीचे १४४ कलम लागू*

 

कोल्हापूर जिल्हाधिकारी मा. रेखावर


हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी


कायदा व सुव्यवस्था राखण्याचे ए. वाय  पाटील, भैय्या माने, आर. के. पोवार, युवराज पाटील यांचे आवाहन......भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने जमावबंदीचे १४४ कलम लागू करून किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. तसेच कागलमध्ये आयोजित केलेला मुश्रीफ समर्थकांचा मेळावाही रद्द करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राष्ट्रवादीची शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा