Breaking

सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

*धरणगुत्ती विभूते शाळेजवळ अपघात ; युवक गंभीर जखमी*

 


शिरोळ तालुका प्रतिनिधी - रोहित जाधव


      फिर्यादी फारुख अजिज मुजावर व मोहसीन अजिज मुजावर दोघे राहणार प्लॉट नंबर 14 जयप्रकाश हौसिंग सोसायटी धरणगुत्ती ता. शिरोळ हे 19 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास MH09 DF5475 passion pro मोटर सायकल वरून विभुते शाळेजवळ टर्न करून रत्नाप्पाण्णा कुंभार सहकारी सूतगिरणी तमदलगे ता.शिरोळ येथे जात असताना यातील फिर्यादी हा त्यांची मोटरसायकल शाळेजवळ टर्न करून KPT ते चौडेश्वर फाटा बायपास रोडवर चौंडेश्वरी फाट्याकडे जाण्यासाठी येत असताना रोडचे दक्षिण बाजूस असलेल्या साईड पट्टीवर दुचाकी आले असता चौंडेश्वरी फाट्याकडे जाणाऱ्या  ट्रक KA 28 C3379 ही 12 चाकी ट्रकने पाठीमागून धडक दिली.    

       संशयित आरोपी चालक शंकर सुभाष भोसले वय वर्षे 24 राहणार नराळे ता. सांगोला जि. सोलापूर यांनी भरधाव वेगाने निष्काळजीपणाने येत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून फिर्यादी यांचे मोटरसायकला पाठीमागील बाजूस डाव्या बाजूने जोराची ठोकर दिली. ठोकर जोरदार असल्यामुळे फिर्यादी व त्यांचे पाठीमागे बसलेला त्याचा भाऊ मोहसीन मुजावर यास उजव्या पायाच्या पंजाला व उजव्या हाताच्या कोपऱ्यात जबर मार लागून गंभीर दुखापत करून मोटरसायकल चे नुकसान करण्यास कारणीभूत झाल्याने यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली आहे. 

    सदर ट्रक चालकाविरुद्ध विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा