Breaking

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

*रुकडी कॉलेजमध्ये मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

 

नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर


*प्रा.अक्षय माने :कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


   रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब अतिग्रे,  दिपाली आॕप्टीशियन इचलकरंजी,  नॕब नेत्र रुग्णालय मिरज आणि चौगुले स्वीट मार्ट अॕंड डेअरी इचलकरंजी यांच्या संयुक्त्त विद्यमाने या तपासणे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

      आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये नॕब नेत्र रुग्णालय मिरज येथील वैद्यकीय अधिकारी यांनी नेत्र तपासणी केली तर दिपाली आॕप्टीशियन इचलकरंजी यांच्या वतीने नेत्र तपासणी करून गरजूंना अल्पदरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. या शिबिराचा लाभ रुकडीसह परिसरातील नागरिकांना झाला. यावेळी राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष रो.यतिराज भंडारी, सेक्रेटरी रो.राजू तारदाळे रोटरी क्लब ऑफ अतिग्रेचे अध्यक्ष रो.प्रशांत गुरव, सेक्रेटरी रो.अभिजीत पाटील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे कम्युनिटी सर्व्हिस - डायरेक्टर रो. घनश्याम सावलानी, रोटरीचे इतर सदस्य उपस्थित होते. 

     या शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश मोरे व डॉ. शंकर दळवी यांनी उत्तम पद्धतीने केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा