![]() |
गणपतराव दादा पाटील कदम सरांचा सत्कार करताना |
*शशिकांत घाटगे : जांभळी प्रतिनिधी*
स्व.आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील हायस्कूल जांभळीचे शिस्तप्रिय शिक्षक मा.सोपान कदम सर यांची शिरोळ तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात झाली.
हायस्कूलमध्ये कडक, शिस्तप्रिय व मनमिळावू शिक्षक म्हणून त्यांची ख्याती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व प्रश्न सोडवू सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन व संस्थेचे कार्य उत्तमरित्या पार पाडेन असे प्रतिपादन या प्रसंगी त्यांनी केले.चेअरमन पदी निवड झाल्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे व उत्साहात वातावरण तयार झाले आहे.
तसेच मा.गणपतराव पाटील दादा चेअरमन श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ व स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील हायस्कूल जांभळीचे चेअरमन यांनी दत्त कारखाना कार्यस्थळी मा.सोपान कदम यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. स्वर्गीय आप्पासाहेब सा.रे.पाटील हायस्कूल संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ.पिसाळ मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या.
सोपान कदम यांच्या या निवडीने सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.
Abhinandan sir
उत्तर द्याहटवा