![]() |
पनपालिया कुटुंबियाकडून सिमेंटची मदत |
हिना मुल्ला : जयसिंगपूर प्रतिनिधी
जयसिंगपुरातील पनपालिया कुंटूंबियांनी आई वृध्दाश्रमास बांधकामासाठी सिमेंटची आवश्यकता आहे हे कळल्यानंतर तसेच बियाणी कुंटूंबियानी केलेल्या मदतीतुन प्रेरणा घेऊन काल आई वृध्दाश्रमास ७० पोती सिमेंटची मदत देऊन प्रचंड मोठा दातृत्व दाखवले.
पनपालिया कुंटूंबियांनी केलेली मदत आई वृद्धाश्रमास लाख मोलाची आहे. नक्कीच ही मदत आई वृद्धाश्रमातील अनाथ व निराधार वृध्दांच्या दु:खावर फुंकर घालणारी आहे. आम्ही त्यांचे हे उपकार कधीही विसरू शकणार नाही. आई वृध्दाश्रम त्यांचे कायमचे ऋणी राहील. अशी आई वृध्दाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांनी मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यासाठी आई वृध्दाश्रमाचे आश्रयदाते आणि विश्वस्त मंडळाचे सदस्य मा. विपीन बियानी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा