![]() |
संगम युवक मंडळ शिरढोण |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
शिरढोणच्या संगम युवक मंडळाची स्थापना १९९२ रोजी झालेली असून या मंडळाचे अधिकृत रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती- धर्मातील सर्व घटक एकदिलाने काम करत असतात. मंडळाच्या स्थापनेपासून मंडळ सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. दरवर्षी गणेशोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती मिरवणूक अत्यंत दिमाखदार व उत्साही वातावरणात संपन्न होत असते.
मंडळाचा सामाजिक कार्य पाहून कुंरुदवाड पोलीस स्टेशन अंतर्गत २७ गावामध्ये स्पर्धा योजनांमध्ये या मंडळाने सन १९९९ व २००४ रोजी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावलेला आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव काळामध्ये ग्राम स्वच्छता मोहिम, रक्तदान शिबिर, सकल आरोग्य शिबिर, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेणे व प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी व्याख्यान आयोजित करणे अशा भरीव सामाजिक कार्यक्रमाचा आयोजन या मंडळाच्या वतीने केले जाते. त्याचबरोबर अत्यंत गरीब व गरजू ह विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करणे व अन्य सामाजिक उपक्रम उत्साहाने राबविले जातात.
मंडळाच्यावतीने विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून गावातील नागरिकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी सोंगी भजन, विविध सुगम गायन व अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
मंडळाच्यावतीने समस्त गणेश भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. तसेच स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानून मंडळाची वाटचाल पुढच्या दिशेने आहे. विवेकानंद यांची १५० जयंतीनिमित्त रथ,घोडे व हत्ती यांच्यासह अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक काढली जाते.
या मंडळाचे काही कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच या पदापर्यंत पोचले असून मंडळाच्या सामाजिक कार्यप्रणालीप्रमाणे त्यांचे जनहितार्थ कार्य सुरू आहे. या मंडळाची ३० वर्षाची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा या मंडळाच्या विद्यमान सदस्यांनी उत्तम पद्धतीने चालू ठेवली आहे.
लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाड व कुरुंदवाड पोलीस प्रशासनाने आयोजित विभागीय स्पर्धेत ९ गावामध्ये हे मंडळ प्रथम स्थानी राहिले आहे.मंडळाने केलेल्या कामाची दखल घेत साहित्य अकादमी व शिरढोण ग्रामीण साहित्य संमेलन यांचा मानाचा युवा गौरव पुरस्काराने या मंडळाला सन्मानित करण्यात आले आहे.
गेल्या तीस वर्षापासून ते आजतागायत या मंडळाने केलेलं काम कौतुकास्पद असून गावात व पंचक्रोशीत केलेल्या रचनात्मक कामाची नेहमीच चर्चा असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा