Breaking

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

कराडच्या स. गा. म. कॉलेजमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा समारोप कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

एफ.डी.पी., सांगता समारंभ


   गीता माने : सहसंपादक


फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर (PMMMNMTT) ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणेचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथे 13 सप्टेंबर 2021 ते 18 सप्टेंबर 2021 या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.

      वन विक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या या कालावधीत उपस्थित सहभागी प्राध्यापकांना ऑनलाइन   मार्गदर्शन करण्यासाठी देशातील विविध तज्ज्ञांनी संशोधन पद्धती व आकडेवारी विश्लेषण (Research Methodology and Data Analysis या विषयावर विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. त्यामध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ न्यू दिल्ली येथील प्रो.डॉ. मनोज कुमार, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तामिळनाडूचे प्रो. डी एम सकटे, सागर मध्य प्रदेशातील डॉ.कश्यप, लखनऊ येथील डॉ.कौशल, बेलगाम कर्नाटक का येथील डॉक्टर हर्षा हेगडे, सुरत येथील प्रो.विमल त्रिवेदी, सालेबरीसी युनिव्हर्सिटी यु एस ए चे व्हिजिटिंग प्रो.डॉ.प्रवीण सप्तर्षी डॉ. ऐ के गोयल नवी दिल्ली याच बरोबर महाराष्ट्रातील दिग्गज विचारवंत व अभ्यासक प्रा.डॉ. व्ही. बी जुगळे, प्रा. डॉ.पी.एस.कांबळे, प्रा.डॉ.एस.एस महाजन,प्रा.डॉ.एम.एस.देशमुख, प्रा. डॉ.राजीव चिकाटे, प्रा.डॉ.मधुकर कस्तुरे,प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे,डॉ. निलेश पोवार, डॉ. जगन कराडे, धनंजय सुतार इत्यादी साधन व्यक्तीचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी देशभरातून 243 प्राध्यापक सहभागी झाले होते. मान्यवर साधन वक्त्यांनी केलेलं चौफेर मार्गदर्शनामुळे हा एफ.डी.पी. यशस्वी होऊ शकला अशा प्रकारची प्रतिक्रिया उपस्थित सहभागी प्राध्यापकांनी दिली आहे.

         आज एफ.डी.पी.चा सांगता समारंभ ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मानसिंगराज निंबाळकर वनस्पतीशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.एस. ए. पाटील उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. गिरीश कल्याणशेट्टी यांनी केले. उपस्थित असलेल्या देशातील काही सहभागी प्राध्यापकांनी दिलखुलासपणे कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मनोगते व्यक्त केली.

एफ.डी.पी. समन्वयक,डॉ.ए.के.पाटील


     फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे समन्वयक डॉ.ए के.पाटील यांनी  कार्यक्रमाचे आभार मानताना विविध घटकानी केलेल्या सहकार्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले. त्याचबरोबर संस्था व कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या सहकारी प्राध्यापक व इतर घटकांनी  केलेल्या सहकार्याबद्दल  हा एफडीपी यशस्वी होऊ शकला अशा प्रकारचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा