![]() |
वजीर रेस्क्यू फोर्सचा सन्मान |
*प्रा.चिदानंद अळोळी : विशेष प्रतिनिधी*
*सहारा फौंडेशनच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक, वैद्यकीय , न्याय, सामाजिक, पत्रकार, रोजगार, सहकार, क्रीडा, कोरोना व महापुरात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुणीजणांचा "गौरव समारंभ व राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार कार्यक्रम" आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी गांधी मंगल कार्यालय कबनूर येथे आयोजित केला होता. 127 पैकी 26 जणांना यावेळी हा पुरस्कार दिला गेला. त्यामध्ये बारा महीने चोवीस तास तत्पर सेवा देणारी जिल्ह्यासाठी व शिरोळ तालुक्यासाठी देवदूत ठरलेली व महापूर , कोरोना महामारी आणि इतर कुठल्याही आपत्ती काळात उल्लेखनीय कार्य करणार्या "वजीर रेस्क्यू फोर्स"ला कोरोना योद्धा हा राज्यस्तरीय पुरस्कार आमदार मा.श्री. सुरेश हाळवणकर व मा. श्री. सम्राट महाडीक (भैय्या) यांचे हस्ते प्रदान करणेत आला. यावेळी सहारा फौंडेशनचे सस्थापक- मा. श्री. पापालाल सनदी, मा. सौ. रेश्मा सनदी(माजी सभापती, हातकणंगले), अध्यक्ष - मा.श्री. सचिन आंबी, खजिनदार परवेज मुजावर, महेश कांबळे, सेक्रेटरी जैद भोकरे व विविध स्तरातील इतर मान्यवर, नागरिक व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते.*
वजीर रेस्क्यू फोर्सचे *संस्थापक अध्यक्ष अब्दुल रउफ पटेल* यानी आम्हास त्याच्या कार्याची माहिती दिली यांचे सामाजिक कार्य हे 2005 च्या महापुरापासून सुरू झाले . या महापुरात त्यांनी जवळपास 15 हजार लोकांचे स्थलांतर यांनी या संघटने मार्फत केले .2019 च्या महापुरात 8732 लोकांचे स्थलांतर व 2021 च्या महापुरात 3100 लोकांचे स्थलांतर हे या वजीर रेस्क्यू फोर्स मार्फत करण्यात आले आहे . या संपूर्ण महापुरात एकूण 117 लोकांचे जीव हे वाचवले आहेत म्हणजे त्यांना बुडण्यापासून वाचवले आहे , या फोर्स मध्ये 49 स्वयंसेवक हे युवकांना आपत्ती व्यवस्थापन संबंधी प्रशिक्षित सुद्धा करतात यामध्ये सद्य स्थितीला शिरोळ तालुक्यात 312 स्वयंसेवक व संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात 850 स्वयंसेवक हे नेहमी सदैव सेवेस कार्यरत असतात .
या फोर्स मार्फत आजपर्यंत 5600 मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत अशी माहिती अध्यक्ष श्री रौफ पटेल यांनी दिली त्याचप्रमाणे 2020 व 2021 च्या कोरोना काळात या स्वयंमसेवकांनी जीवाची पर्वा न करता लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केले आहे ,तसेच सर्व कोरोना काळात लोकांना नियम पाळण्यासाठी जागरूक करण्याचे काम ही फोर्स करत होती , सर्व चेक पॉईंट्स वर पोलिस , होमगार्डस सोबत मदत करत होते.
याच्या कार्यची दखल ही आंतरराष्ट्रीय न्युज ने सुद्धा घेतली आहे या मध्ये साऊथ आफ्रिका देशातील न्यू फ्रेम या मीडियाने तसेच ऑस्ट्रेलिया मधील मीडियाने सुद्धा घेतली आहे.प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ठिकाणी लोकांना शिस्त , सामाजिक अंतर , मास्कचे महत्व व पालन करण्यासाठी तत्पर असतात .या पुरस्काराने पुन्हा काम करण्याची ऊर्जा प्राप्त होईल असे मत वजीर रेस्क्यू फोर्सच्या अध्यक्ष यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा