Breaking

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या(सुटा) पदाधिकाऱ्यांचे महाविद्यालयीन संपर्क दौरे सुरू

 

सुटा पदाधिकाऱ्यांचे संपर्क दौरे


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


      शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना अर्थात सुटा संघटनेने प्राध्यापकांचे प्रश्न सातत्याने विविध मोर्चे, धरणे, लाक्षणिक उपोषण व काही वेळेस कोर्टाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी या लढाऊ संघटनेच्या अनेक शिलेदारांनी अहोरात्र पणे प्रयत्न केले आहेत. त्या त्या परिस्थितीत सुटा संघटनेने प्राध्यापकांना न्याय व हक्क मिळवून दिले त्यामुळे प्राध्यापकांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झाले आहे.

विविध महाविद्यालयातील संपर्क दौरे

    सुटाच्या वतीने कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांना भेटी देणारे संपर्क दौरे सुरू आहेत. यामध्ये ७ वा वेतन आयोगाची अंमलबजावणी,प्राध्यापकांची असंख्य प्रलंबित प्रश्न त्याचा पाठपुरावा, वेतन निश्चिती, स्थाननिश्चिती, वैद्यकीय बिले व शिक्षण संचालक व  सहसंचालक कार्यालयास भेटी देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले आहेत.यासंदर्भात केलेल्या कामांची माहिती या दौऱ्याच्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्याचबरोबर covid-19 च्या काळात सुटा संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषदेस ७५ ऑक्सीफ्लोमीटर देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले असल्याची माहिती देण्यात येत आहे. सुटा पतसंस्थेचा कार्यविस्तार सांगली व सातारा जिल्ह्यात करून सुटा सदस्य प्राध्यापकांची सेवा केली जात असल्याची माहिती देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी असंख्य महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भेटी घेऊन प्राध्यापकांशी संबंधित असणाऱ्या शैक्षणिक प्रश्नावर सांगोपांग चर्चा केली जात आहे किंबहुना त्यांच्या काही प्रश्नांचे निराकरण समक्ष करण्यात येत आहे. काही प्रश्न संघटनेच्या पातळीवर कशा पद्धतीने सोडविले जाणार आहेत याविषयीही त्यांना माहिती देण्यात आली. यासाठी हे प्राध्यापकांचे दौरे महत्त्वपूर्ण मानले जात असून कार्यक्षेत्रातील सर्व सुटा सभासद प्राध्यापकाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

       या संपर्क दौऱ्यामध्ये सुटा प्रमुख कार्यवाह डॉ.डी.एन.पाटील, कोल्हापूर जिल्हा सुटा अध्यक्ष डॉ.अरुण पाटील, मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य, डॉ.आर.जी.कोरबू, प्रा.आवटे,डॉ.वैशाली सारंग व खजिनदार डॉ.गजानन चव्हाण हे सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा