![]() |
संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका ठाणे |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
कोल्हापूर: ‘नवमाध्यमांचा उदय आणि जनतेकडून होत असेलला अधिक वापर यामुळे शासकीय जनसंपर्काचे कार्य खूप आव्हानात्मक बनले आहे’ असे मत ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी यांनी व्यक्त केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम एन्ड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने ‘शासकीय जनसंपर्क’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार मध्ये प्रथम दिवशीची पहिल्या सत्रात ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आजच्या काळात जनसंपर्काचे कार्य हे जनसंपर्काच्या परंपरागत व्याख्येपलीकडे गेले आहे. शासकीय जनसंपर्क कार्य करत असताना आज लोकांच्या हातात नवमाध्यम उपलब्ध असल्यामुळे ते सरळ प्रश्न विचारू शकतात त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी स्वतःला अपडेट करणे आवश्यक आहे. वेबिनारच्या दुसऱ्या सत्रात क्षेत्र प्रसिद्धी अधिकारी, सोलापूर अंकुश चव्हाण आणि पत्र सूचना कार्यालय, मुंबई येथील महेश चोपडे यांनीही मार्गदर्शन केले.
अंकुश चव्हाण यांनी कोरोना काळात क्षेत्र प्रसिद्धी विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध कार्याची माहिती दिली. तसेच त्यांनी भारतीय माहिती सेवा क्षेत्रात उपलब्ध नोकरीच्या संधी आणि तयारी या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
महेश चोपडे यांनी केन्द्रशासनाचा जनसंपर्क, DAVP, पत्र सूचना कार्यालय, सेन्सॉर बोर्ड येथील कार्यपद्धती विषयी माहिती दिली.
कार्यशाळेच्या सुरवातीला विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक आणि वक्त्यांचे स्वागत केले. पत्रकार आणि विभागाचे सहयोगी प्राध्यापक सचिन दिवाण यांनी सुत्र-संचलन केले आणि आभार मानले . या प्रसंगी तुळजाराम चतुरचंद कॉलेज , बारामती, संजय घोडावत विद्यपीठ , कोल्हापूर , सोलापूर विद्यापीठ, सोलापूर , मुंबई विद्यापीठ , औरंगाबाद विद्यापीठ, औरंगाबाद येथील पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी आणि प्राध्यपाक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यभरातून १९० पेक्षा अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि पत्रकार यांनी नावनोंदणी केली असून वेबिनार करीता मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
उद्या (१८ सप्टेबर) रोजी कार्यशाळेची सांगता होणार आहे. दुसऱ्या दिवशी वेबिनारमध्ये डॉ. मिलिंद अवताडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महा-पारेषण, निशिकांत तोडकर साह्यक निर्देशक, माहिती व जनसंपर्क संचनालाय, मुंबई आणि औदुंबर चव्हाण, माहिती शिक्षण आणि संवाद तज्ञ संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी), दिल्ली हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शन करणारे सर्व व्याख्याते जर्नालिझम एन्ड मास कम्युनिकेशन विभागाचे माजी विद्यार्थी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा