Breaking

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

शिरोळ पोलिसांची मोठी कामगिरी ; संशयित महिला आरोपीस अवघ्या काही तासात केली अटक


संशयित महिला आरोपी

प्रविणकुमार माने : उपसंपादक


       शिरोळ पोलीस ठाणे गु र नं २१०/२०२१ भा. द.वि.स. कलम ३८१ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी राहुल राजु कुरडे व.व २८ रा. नांदणी ता. शिरोळ यांनी फिर्याद दिली की ५ दि.२१/०८/२०२१ रोजी सायंकाळी ०६.०० वा ते दि. १६/०९/२०२१ रोजी सकाळी ०९.०० च्या सुमारास फिर्यादीच्या मालकीची कुरडे बेकरीच्या दुकानातील कॅश ड्रॉवरमधील वेळोवेळी अंदाजे ३५०००/- रुपये फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेलेबाबत फिर्यादीनी फिर्याद दिली होती.

      सदर गुन्हयाच्या तपासाबाबत  पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरिगिड्डे शिरोळ पोलीस ठाणे यांनी गुन्हे शोध पथकाकडील अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवुन माहिती काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे सदर गुन्हयाबाबत सखोल तपास करुन तसेच गुन्हाचा गोपनीय बातमीदारमार्फत बातमी काढून सदर गुन्हयातील संशयीत महिला अर्चना दिलीप कोळी व. व ४० रा. शिवाजी चौक, हरोली ता. शिरोळ हिला अटक करण्यात आली आहे.

      सदर संशयित महिला आरोपीचा गुन्हयात सहभाग असलेबाबत गुन्हे शोध पथकाची खात्री झालेने त्यास सापळा रचून नांदणी नाका परीसरातुन शिताफीने ताब्यात घेवुन सदर गुन्हयाबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. सदर महिलेकडून गुन्हयातील चोरलेले २८,०००/- रूपये हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर महिला आरोपीस गुन्हयाच्याकामी अटक करणेत आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो ना १६६७ कुंभार हे करीत आहेत.

     सदरची कारवाई मा.शैलेश बलकवडे पोलीस अधीक्षक सो कोल्हापुर, मा.जयश्री गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, मा.रामेश्वर वैजने उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर, पोलीस निरीक्षक मा. डी.एस.बोरीगिडडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ ज्ञानेश्वर सानप, पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, युवराज खरात, महिला पोलीस अस्मीता पाटील व स्नेहल जाधव या गुन्हा शोध पथकाने केली आहे.

       पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या नेतृत्वाखाली चोरीचा छडा अवघ्या सहा तासात लावला आहे. शिरोळ पोलिसांनी केलेले या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा