प्रविणकुमार माने : उपसंपादक
सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील कुमठे फाटा येथील जबरी चोरी करणाऱ्या दोन इसमाना सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत त्यांना पुण्यातून जेरबंद केलेलेआहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दि.20/08/2021 रोजी रात्री 7.30 वा.दरम्यान कुमठे चौक फिर्यादी रोहन पांडुरंग पाटील यांच्या दुचाकी गाडीचे आडवी गाडी मारून त्यांना अनोळखी ईसमानी कोयता दाखवून ऊसात नेऊन मारहाण करून त्यांचेकडील पैसे,ए.टी.एम.कार्ड आणि अंगठी काढून घेतलेबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे कामी एल.सी.बी.कडील एक पथक भेट देऊन गुन्हयाचा तपास सुरू केला.दि.03/09/2021रोजी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्य़ातील जबरी चोरी करणारे अभिलेखावरील आरोपींना चेक करत पेट्रोलिंग करीत माहीती घेत असतानाच चेतन महाजन व संदिप नलवडे या बातमीदाराकडून बातमी मिळाली आहे की सांगली पोलीस ठाणे गु.र.नं.234/2021भा.दं.वि.394,397 व 34 हा गुन्हा पूणे येथील रामवाडी परिसरात राहणारे सोनल रसाळ व बबलू चव्हाण यानी केले असलेचे माहीती मिळालेनंतर पोलीस.नि.सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली एल.सी.बी.पथक पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने खाजगी वाहनाने सांगली तून रवाना होऊन पूणे येथील रामवाडी परिसरात दाखल होऊन मिळालेल्या बातमीनुसार आरोपी गुंजन टाॅकीज चौकाजवळ असलेल्या डाॅमीनोज इमारतीजवळील एक पडीक बिल्डींगजवळ ग्रे रंगाचे अॅकटीवा गाडीवरून येणार असलेची माहीती मिळालेनंतर पथकाने सापळा रचून ग्रे रंगाचे अॅक्टिव्हा गाडीवरून अंगात राखाडी रंगाचे जरकीन व लोअर आणि हिरवे लाल पटटयाचा शर्ट घातलेले दोघेजण येताना दिसले असता अधिकारी व अंमलदार यानी त्याना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपले नाव 1)सोनल साहेबलाल रसाळ व 2) बबलू संतोष चव्हाण दोघे रा.पूणे असे सांगीतले. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्या डिकीत एक कोयता, दोन मोबाईल,व अंगठी मिळून आली त्यांचेकडे जबरी चोरीबाबत चौकशी केली असता सदर जबरी चोरी अनोळखी महीलेने पैसे देऊन करवून घेतलेचे सांगीतले.सदर आरोपींकडून कोयतयासारखी दिसणारी पारळी, अॅक्टिव्हा गाडी,अंगठी, दोन मोबाईल असा एकूण 79200/किंमतीचा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईमधे पोलीस.नि.गायकवाड. सपोनि निशानदार.सुर्यवंशीसाहेब, रूपनर,कदम,नलवडे ,वगैरेचा समावेश असून सदर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा