Breaking

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

कोल्हापूर परिसरात भूकंपाचे धक्के...



 

    कोल्हापूर परिसरात शनिवारी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी ३.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कळे ते पूनाळदरम्यान होता. या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


   यासंदर्भात, कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी अधिक माहिती देत म्हणाले, "कोल्हापूर पासून सुमारे 18 किलोमीटरवर असणाऱ्या कळे ते पूनाळदरम्यानच्या भागात शनिवारी रात्री ११ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. मात्र त्याची तीव्रता कमी असल्याने कसल्याही प्रकारची जीवित व वित्त हानी झालेली नाही. जमिनीखाली तब्बल ३८ किलो मीटर खाली भूकंपाचा केंद्र बिंदू  होता. याशिवाय भुमापन केंद्र वारणा, तसेच कोयना धरणावरील भूमापन केंद्रावरही या भूकंपाची नोंद झाल्याचे समजते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा