![]() |
गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले |
हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस दप्तरी गंभीर कारनाम्यांचे रेकॉर्ड असलेल्या तब्बल ९० गुन्हेगारांना एकाचवेळी दहा दिवसासाठी शहरासह करवीर तालुक्यातून हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगाारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
त्यात राजारामपुरीतील ४०, लक्ष्मीपुरी १४, राजवाडा १७, शाहूपुरीतील १९ सराईतांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रस्तावाला प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. शहरातील आणखी ४८ सराईत ‘ रडार’ वर आहेत. दोन दिवसात कारवाई शक्य असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा