![]() |
श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज,शिरोळ |
गणेश कुरले : शिरोळ प्रतिनिधी
शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चालविले जात असलेल्या श्री दत्त पॉलिटेक्निकचा उन्हाळी परीक्षा २०२१ च्या परीक्षेत पाचही विभागांचा निकाल उत्कृष्ट लागला. कॉलेजने निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखल्याने कौतुक होत आहे. यावर्षी विविध विषयांमध्ये १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा खवला.
यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:-
कॉम्प्युटर विभाग:- प्रथम वर्ष-प्रथम क्र.-मानसी महावीर कुरडे(८५.५०℅). द्वितीय वर्ष-प्रथम क्र.- स्नेहल पोपट गोधडे (८६.२७℅). तृतीय वर्ष-प्रथम क्र.-निकिता सतीश माने (९१.६६℅).
सिव्हिल विभाग:-प्रथम वर्ष-प्रथम क्र.- वैष्णवी विलास सुतार (८०℅). द्वितीय वर्ष-प्रथम क्र.- आदित्य कुमार (८८.८८℅). तृतीय वर्ष-प्रथम क्र.-श्रेयश अंकुर पाटोळे (८९℅).
इलेक्ट्रिकल विभाग:- प्रथम वर्ष-प्रथम क्र.- कार्तिक सत्याप्पा न्हावी (७७.६३%). द्वितीय वर्ष-प्रथम क्र.-अक्षय संदीप पाटील (८६.८६℅). तृतीय वर्ष-प्रथम क्र.- अमृता तानाजी कांबळे (८४.३७℅).
इ. अँड टी.सी.विभाग:- प्रथम वर्ष-प्रथम क्र.-शोएब अमिरबाशा इनामदार (७८.३८℅). द्वितीय वर्ष-प्रथम क्र.- सुमित सतिश नरमदे (८०.५६℅). तृतीय वर्ष-प्रथम क्र.- पाटील कोनाई मयुरी सुजित (८९.५९℅).
मेकॅनिकल विभाग:- प्रथम वर्ष-प्रथम क्र.श्रेयस संजय गौराजे (७८.९३℅). द्वितीय वर्ष-प्रथम क्र.-वैष्णवी अभयकुमार खटावे (८९.३℅). तृतीय वर्ष-प्रथम क्र.-समीरा रफिक जमादार (९६.२१℅).
संस्थेचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, कोरोना महामारीच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजने पाचही विभागांचा निकाल सर्वोत्कृष्ट लावून विद्यार्थ्यांचा आणि पालकांचाही विश्वास संपादन केला आहे. यशाची ही उज्ज्वल परंपरा अशीच पुढे सुरु राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे प्राचार्य पी. आर. पाटील, डायरेक्टर ए.एम.नानिवडेकर यांनीही विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याबरोबरच नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया कॉलेजमध्ये सुरू असून प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी कॉलेजशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांना संस्थेचे एक्स ऑफिसीओ ट्रस्टी एम. व्ही. पाटील, सेक्रेटरी ए. बी. शिंदे, कॉलेजचे उपप्राचार्य एन. बी. भोळे, विभाग प्रमुख एस. पी. चव्हाण, मिस.पी. बी. पाटील, ए. टी. पाटील, प्रथम वर्ष समन्वयक ए. ई. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सचिन शिंदे, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा