![]() |
गणेश कुरले : धरणगुत्ती प्रतिनिधी
ग्रामपंचायत धरणगुत्ती येथे डॉ.आप्पासाहेब सा रे पाटील सोशल फाउंडेशन धरणगुत्ती व सिनर्जी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगुत्ती व परिसरातील लोकांच्या आरोग्य हितार्थ व सुरक्षिततेसाठी सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी दत्त उद्योगसमूहाचे चेअरमन मा.श्री गणपतराव पाटील यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून लोकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन या निमित्ताने केले.
यावेळी माजी आमदार मा.उल्हासदादा पाटील,जिल्हा परिषद सदस्य मा.हर्षवर्धन नाईक निंबाळकर, पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरीगिड्डे , धरणगुत्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच कांबळे मॅडम, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते व नेते मा.शेखर दादा पाटील व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.
आयोजकांनी या शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य विषयक जागरूकता दाखवून केलेले काम कौतुकास्पद आहे अशा प्रकारची चर्चा जनमानसात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा