![]() |
संत गाडगे महाराज महाविद्यालय कराड |
प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक
कराड येथील रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज (स्वायत्त महाविद्यालय) मध्ये यूजीसी एचआरडीसी सेंटर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे यांच्यातर्फे आयोजित केलेला फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने सोमवारी अत्यंत उत्साहात पार पडले. उद्घाटनासाठी कर्नाटका युनिव्हर्सिटी धारवाडचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.टी.बागलकोटी हे ऑनलाईन उपस्थित होते. कॉलेजचे मा.प्राचार्य डॉ.मोहन राजमाने हे अध्यक्षस्थानी होते.
महाविद्यालयाचे IQAC समन्वयक प्रा.डॉ.गिरीश कल्याणशेट्टी यांनी उपस्थित सर्व मान्यवर व सहभागी प्राध्यापकांचे मनस्वी स्वागत केले. प्रास्ताविकात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजनाबाबत ची सविस्तर मांडणी करीत शास्त्रशुद्ध संशोधन पद्धतीचे माहिती व ज्ञान सहज प्राप्त व्हावे तसेच डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून परिपूर्ण संशोधन कशा पद्धतीने करता येईल याबाबत ते बोलले व पाहुण्यांची ओळख करून दिली.
प्राचार्य डॉ.राजमाने यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात संशोधनाची नितांत आवश्यकता असून यासाठी परिपूर्ण व शास्त्रशुद्ध संशोधनाचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. या एफडीपीच्या माध्यमातून सहभागी प्राध्यापकांना नक्कीच त्याचा लाभ होईल अशा प्रकारचा विश्वास ही याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
सदर FDP चे उद्घाटन मा.डॉ. सिद्धाप्पा बागलकोटी यांनी केले. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे समन्वयक प्रा.डॉ.ए.के.पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
पहिल्याच दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा.डॉ.मनोज कुमार तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे डॉ.पी.एस.कांबळे, डॉ.व्ही.बी.जुगळे व शेवटी डॉ.निलेश पवार या तज्ञ प्राध्यापकानी संशोधनात्मक पद्धती व आकडेवारी विश्लेषण यासंदर्भात सांगोपांग पद्धतीने विश्लेषण करून सहभागी प्राध्यापकांना उत्तम व सखोल ज्ञानदान करून एफडीपीचा हेतू परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह गुजरात,तमिळनाडू,गोवा, आंध्रप्रदेश,मध्यलप्रदेश,दिल्ली,पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यातून 222 प्रतिनिधी ऑनलाइन सहभागी झाले आहेत.
"संशोधन पद्धती आणि आकडेवारी विश्लेषण" (Research Methodology and Data Analysis)या विषयाचा हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम सहा दिवसांसाठी असून देशातील विविध तज्ञ मंडळी यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
देशभरातून सहभागी असणाऱ्या प्राध्यापकांनी या FDP च्या परिपूर्ण नियोजन व आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा