![]() |
गणपती विसर्जन पारंपारिक मिरवणूक |
प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी
अकिवाट : पाच दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. अकिवाट व परिसर गजबजून गेला होता. रात्री उशिरापर्यंत शांततेत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक विसर्जनसाठी सलग दुसऱ्या वर्षी भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
गौरी आणि घरगुती गणपतींना मंगळवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी भाविकांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. टाळ- मृदुंग अशी पारंपरिक वाद्ये वाजवत बाल शिवाजी कला क्रीडा व संस्कृती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरगुती गणेश विसर्जन केले.पारंपरिक आरत्या म्हणत बाप्पाचे आणि गौरीचे विसर्जन केले. दुपारनंतर घरगुती विसर्जनासाठी वर्दळ वाढली. पावसाने उसंत घेतल्यामुळे गणेशभक्तांना गणपती व गौराईला उत्साहाने निरोप देता आला. भरजरी साडी आणि दागदागिने घालून सजवलेल्या माहेरवाशिणी गौराईची प्रसादाच्या शिदोरीसह पाठवणी केली.यासाठी सामाजिक संघटना ,संस्थांचे देखील चांगले सहकार्य लाभले.त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा