![]() |
नृसिंहवाडी श्री दत्त दक्षिण सोहळा |
*प्रा.चिदानंद अळोळी ; नृसिंहवाडी प्रतिनिधी*
सातत्याने पडणारा प्रचंड पाऊस व धरण पाणलोट क्षेत्रातील विसर्ग यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात आज मंगळवार दि.14/09/21 रोजी रोजी दुपारी 4.30 वा चालू सालातील तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.
संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व गोवा या राज्यातील लाखो दत्त भक्त हे प्रत्येक वर्षी नृसिंहवाडीत दर्शनासाठी येत असतात . त्याचप्रमाणे या दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करण्याचा लाभ भाविक घेत असतात.पण कोरोना संकटामुळे गेली अनेक महिने मंदिर हे दर्शनासाठी बंद आहे .सध्य स्थितीला कोरोनाकाळात दर्शनासाठी भाविकांना बंदी असल्यामुळे या दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाच्या पर्वणीचा लाभ घेता आला नाही. त्याचप्रमाणे आज घरगुती गणपती विसर्जन व दक्षिणद्वार सोहळा याचा सुद्धा योग जुळून आला आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा