Breaking

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

यंदाच्या गणेशोस्तवासाठी नियमावली जाहीर ; हे असतील निर्बंध...

Photo source - unsplash



     कोरोना संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी राज्य सरकारने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली घालून दिली आहे. कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा यासाठी गृहविभागाने नियमावली जाहीर केली आहे. व आरोग्याच्या सुरक्षेसाठी यंदाही गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून प्रशासनास व आरोग्य व्यवस्थेस सहकार्य करण्याची विनंती शासनाकडून केली आहे.


काय आहे नियमावली?

  • गणेश मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट तर घरगुती मूर्ती २ फुटांच्या मर्यादेत असावी.
  • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक. व त्यांनी केलेल्या धोरणानुसार मंडप घालावा.
  • या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे.
  • मुर्ती पर्यावरणपूरक शाडूची असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे.
  •  विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रीम विसर्जन कुंडांमध्ये विसर्जन करावे.
  •  वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यासच त्यांचा स्वीकार करावा.
  • मंडपाजवळ गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • आरोग्य विषयक व सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती प्रदर्शित करण्यास भर द्यावा.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करावी.
  • रक्तदान शिबिर आयोजित करण्यास पुढाकार घ्यावा.
  • शिबिरांमध्ये कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती करण्यात भर देण्यात यावा.
  • गणेश उत्सव नियमावली बरोबरच आधीच्या नियमांचे देखील काटेकोर पालन करावे.यासाठी गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देण्यात   येणार नाही.
  • आरती, भजन, किर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणांसंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे
  • गणेशमूर्ती चे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
  • विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
  • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
  • संपूर्ण चाळीतील व गल्लीतील घरगुती गणेशमूर्तीच्या एकत्रित विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा