![]() |
शिवनात बियाणी,बोरेवेल्स पूजन |
प्रा.मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी
निमशिरगांव येथे आई वृध्दाश्रमाचे बांधकाम सुरू असल्याने बांधकामास आणि आई वृध्दाश्रमास कायमस्वरूपी पाण्याची अत्यंत गरज होती. ही गरज लक्षात घेऊन बियानी परिवारातील शिवनाथ दिपक बियानी यांनी आई वृध्दाश्रमास बोअर मारून देण्यास पुढाकार घेतला. आणि काल बोअर मारला. आई वृध्दाश्रमातील वृद्धांच्या पुण्याईने आणि आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने बोअरला १५०" आणि १७५ फुटांवर फुल्ल दोन इंची पाणी लागले आहे.
बियानी परिवारातील सर्वच सदस्य आई वृध्दाश्रमाच्या स्थापनेपासून आई वृध्दाश्रमाच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. प्रत्येक अडिअडचणीला बियानी परिवार धाऊन येऊन मदत करत असतो.
बियानी परिवारातील प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आणि आनंदामध्ये आई वृध्दाश्रमातील वृध्दांना सामिल करून घेतले जाते. त्यांना कशाचीही कमतरता भासु दिली जात नाही. त्यांच्या आवडिच्यां खाद्यपदार्थांच्या पासून ते त्यांना लागणारे चेष्मे , कपडे , भांडी , आरोग्य शिबीर , औषधे , आर्थिक मदत , तसेच त्यांना लागणाऱ्या दैनंदिन गोष्टी सुध्दा पुरविल्या जातात. आई वृध्दाश्रमातील वृध्दांना वृध्दांना कदापी एकटे वाटु नये आणि त्यांचे वृध्दापकाळाचे जीवन सुखा समाधानाचे जावावे यासाठी बियानी परिवार प्रयत्नशिल आहे. बियानी परिवाराचा खुपचं मोठा आधार आई वृध्दाश्रमास असलेने आम्हाला अनेक संकटांवर मात करता येते. यावेळी सुध्दा आई वृध्दाश्रमात बोअर मारून कायमस्वरूपी पाण्याची सोय केल्याबद्दल बियानी परिवाराचे मनापासून आभार मानले.
यावेळी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. दत्तात्रय बोरीगिड्डे आणि विपीन बियानी भैय्या आणि दिपक बियानी भैय्या उपस्थित होते.
बियाणे परिवाराने केलेल्या या सामाजिक कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा