अनोळखी व्यक्तिद्वारे ऑनलाईन चॅटिंग मधून जवळीक साधून अश्लील संभाषण, फोटो, व्हिडिओ ची देवाण घेवाण करवली जाते, व नंतर ते अश्लील संभाषण समाजात पसरवण्याची धमकी देवून पैशांची मागणी केली जात आहे.
![]() |
Photo source- DNA India |
लॉकडाऊन् मधे जसे ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत त्याबरोबरच ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. ज्यामध्ये सध्या बँकिंग फसवणुकीबरोबरच हनी ट्रॅप देखील जोरात फोफावत आहे. ज्यामध्ये राज्यातील बरेच तरुण तरुणी बळी बनत आहेत.
इचलकरंजी, जयसिंगपूर परिसरातील अनेक तरुण यात फसत आहेत, मात्र समाजात बदनामी होईल, या भीतीने असे प्रकार उघडकीस येताना दिसत नाहीत. त्यामुळे तरुण मानसिक व शारीरिक छळ केल्याने आत्महत्येसारखा टोकाचे पाऊल उचलण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
![]() |
Photo source - the print |
काय आहे हनी ट्रॅप ?
सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे की व्हॉट्सअँप, फेसबुक मेसेंजर व इतर काही ऑनलाईन चॅटिंग अॅप मधून तरुण - तरुणींना अश्लील प्रलोभन दाखवून जवळीक साधली जाते. मग त्यांनी केलेल्या अश्लील कृत्याचे फोटो - व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांना ब्लॅकमेल केले जाते. व त्याबदल्यात भरमसाठ पैशांची मागणी केली जाते.
तंत्रज्ञानाच्या युगात ‘हनी ट्रॅप’चे स्वरूप बदलले आहे
पूर्वी ‘हनी ट्रॅप’ मधे फसवणाऱ्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्षात भेटत असत. आता मात्र व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम व विविध चॅट ॲप अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सावध हेरले जात आहेत.
असा लावला जातो ‘ट्रॅप’
एखादा मोबाईल नंबर शोधून त्यावर स्वतःची जुजबी माहिती देणारा पहिला मेसेज टाकला जातो. कुतूहल म्हणून एखाद्याने त्याला प्रतिसाद दिला की मग गोड बोलून जवळीक साधली जाते. मग पूर्वी केलेल्या अश्लील संभाषणाचा वापर करून खंडणी मागितली जाते.
फसवणूक टाळण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी जवळीक साधू नये. तरीही अशाप्रकारे आपली फसवणूक झाली असेल तर तत्काळ पोलिसांत फिर्याद दाखल करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा