![]() |
शिवकालीन युद्धकला सादर करताना शेलार मामा |
कोल्हापूर : संपूर्ण आयुष्य शिवकालीन युद्धकला जोपासण्याचा, त्याचा प्रसार- प्रचार करण्यात मग्न असणारे कोल्हापूर - शिरोली गावचे श्री दत्तू विठू पाटील (बापू), ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र शेलार मामा म्हणून ओळखत होता,त्याचे आज राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
वय वर्षे ८० असताना सुध्दा शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरवर्षी ते रायगडला पायी येत असत. ते नेहमी म्हणायचे की, रायगडावर माझे महाराज बसले आहेत आणि त्यांना भेटायला मी जाणारच. 'शिवकालीन युद्धकलेचा प्रसार व प्रचार करण्याचा संकल्प त्यांनी संपूर्ण आयुष्यभर जपला. मृत्युशय्येवर असताना अंतिम क्षणी मला माझ्या राजांचा व संभाजीराजांचा फोटो दाखवा अशी मागणी त्यांनी केली होती. यातूनच त्यांची छत्रपती शिवाजी महाराज व राजघराण्यावरील निष्ठा व प्रेम दिसून येते.
![]() |
युवराज संभाजीराजे व शेलार मामा |
माझ्यावर व छत्रपती घराण्यावर निस्सीम प्रेम करणारा एक रांगडा शिवभक्त कालवश झाला. अंतिम समयी त्यांच्या तोंडी एकच वाक्य होते; माझ्या राजांचा, संभाजीराजेंचा फोटो मला दाखवा. त्यांच्या मुलाकडून ही गोष्ट ऐकताना मला गहिवरून आलं. अंतिम श्वासातदेखील छत्रपती घराण्यावर असलेलं प्रेम, निष्ठा आणि विश्वास यातून व्यक्त होत होता. प्रत्येक शिवकार्यात तल्लीन होणाऱ्या या शिवभक्तास भावपूर्ण श्रध्दांजली !
युवराज संभाजीराजे.
![]() |
युवराज संभाजराजे सोबत रायगडावरील एक क्षण |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा