![]() |
कृत्रिम जलकुंड, जयसिंगपूर नगर परिषद |
प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक
राजर्षि शाहू राजांनी जयसिंगपूर शहराची स्थापना केली. साहजिकच त्यांच्या आचार विचारांचा प्रभाव येथील प्रत्येक घटकावरती झालेला आहे.कारण जयसिंगपूर नगरपरिषदेने शाहू राजांच्या विचारांची जपणूक करीत सकल समाजाचा विचार करून पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रम अत्यंत प्रामाणिक व यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
जयसिंगपूर नगरपरिषद प्रशासनाने पुढाकार घेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरातील गणपती विसर्जन नदी, विहिरी व अन्य जलकुंडात न करता जल प्रदूषण थांबवविण्यासाठी व पर्यावरणाची जागृती करण्यासाठी नगरपरिषदेने शहराच्या महत्वाच्या ठिकाणी कृत्रिम जल कुडांची व्यवस्था केली होती. या जल कुंडातील विसर्जनाच्या माध्यमातून जवळपास १३०० मूर्तींचे विसर्जन या कृत्रिम जल कुंड्यांमध्ये करण्यात आले होते. तसेच जल कुंडाच्या शेजारीच काही अंतरावर निर्माल्य व अन्य टाकाऊ साहित्याचं संकलन करण्यासाठीची व्यवस्था केली होती. या माध्यमातून जवळपास ९ ट्रॉली निर्माल्य कचऱ्याचे संकलन झाले आहे.
जयसिंगपूर नगरपरिषदेने रेल्वे स्टेशन जवळ, जुन्या नगरपरिषद जवळ, दसरा चौकात, सरकारी दवाखाना जवळ व ९ नंबर शाळा शाहूनगर या ५ ठिकाणी ही व्यवस्था उत्तम पद्धतीने केली होती. याकामी प्रत्येक केंद्रावर नगर परिषदेचे कर्मचारी गणपती विसर्जन होईपर्यंत कार्यरत होते.
जयसिंगपूर नगरपरिषद प्रशासनाने गणपती विसर्जना दरम्यान केलेलं हे काम पर्यावरण पूरक व समाजामध्ये हरित जागृती करणारी असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. यामुळे सर्व नागरिक व गणेश भक्तांकडून मा.मुख्याधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा