Breaking

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

*कोथळी येथे विकास कामाचा धडाका*

 



*जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी*


     कोथळी येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत फंडातून विविध विकास कामांचा शुभारंभ आज मा. खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ.शुभांगी शिंदे यांच्या फंडातून 1 कोटी 34 लाखाचा भरघोस निधी कोथळीचा विकासासाठी सुपूर्त करण्यात आला. तसेच पंचायत समितीचे उपसभापती राजगोंडा पाटील यांच्या पंचायत समिती फंडातून 10 लाखाचा निधी व कोथळीच्या विकास कामासाठी कोथळी  ग्रामपंचायत फंडातून 5 लाखाचा निधी या भरघोस निधीच्या माध्यमातून गावचा विकास उच्च कोटीला होईल असे उद्गार मा. खासदार राजू शेट्टी यांनी काढले.


          सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमगोंडा बोरगावे, स्वागत सरपंच ऋषभ, आभार विजय खवाटे यांनी मानले. या कार्यक्रमास जयसिंगपूर नगरीचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, पंचायत समितीचे उपसभापती राजगोंड पाटील, जयसिंगपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, शिरोळ तालुका सहकारी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष  संजय नांदणे, उद्योगपती हंकारे, उपसरपंच आकाराम धनगर यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा