Breaking

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

मराठा आरक्षणामुळे मिळत नसलेली नोकरी व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

मृत सदाशिव भुंबर



      जालना ;  मराठा आरक्षण नसल्याने मिळत नसलेली मनासारखी नोकरी व नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेल्या नुकसानीला कंटाळून जालना तालुक्यातील येणोरा येथील तरुण सदाशिव शिवाजी भुंबर, वय-22, याने मंगळवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.


    सदाशिव हा पुणे येथे भावासोबत खासगी कंपनीत नोकरीला होता. तो महिन्यापूर्वी  गावाकडे आला होता. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. आयटीआय कोर्स करूनही मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नसल्याने तो निराश होता त्यामुळेच त्याने हे कृत्य केल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा