Breaking

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

लोटस मेडिकल फौंडेशन कोल्हापूर अंतर्गत विशेष मुलांकरिता ऑनलाईन पध्दतीने "स्पंदन कार्यक्रम" आयोजित




     आज दि. १८ सप्टेंबर २०२१ रोजी लोटस मेडिकल फौंडेशन अंतर्गत दर महिन्याला  संस्थेतील विशेष मुलांकरिता घेण्यात येणारा "स्पंदन" कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. स्पंदन कार्यक्रमा निमित्त मुलांसाठी मनोरंजनात्मक कृतीखेळ, व्यक्तिमत्त्व विकास सत्र, जीवन कौशल्य सत्र, क्राफ्ट इत्यादी प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येत असतात पण सध्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने लहान मुलांसाठी हे कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येत आहेत. 





सदर महिन्यातील स्पंदन कार्यक्रम आज शनिवारी दु. ४ ते ५:३० यावेळेत लोटस केअर सेंटर या ठिकाणी घेण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रमात प्रमुख सादरकर्ते श्री. धनंजय नामजोशी (सामाजिक कार्यकर्ते, सर्पमित्र, प्राणीमित्र, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट) यांचा मनोरंजनात्मक कॉमेडी- मिमिक्री शो ठेवण्यात आला होता. ज्यामध्ये त्यानी मुलांना सामाजिक संदेश देत त्यांच्यासोबत सुसंवाद साधला आणि विविध ऍक्ट च्या माध्यमातून सहभागी मुलांचे व संस्थेच्या सहकाऱ्यांचे मनोरंजन केले. सदर कार्यक्रम हा डॉ. किमया शहा (व्यवस्थापकीय विश्वस्त) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे विश्वस्त, सहकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा