Breaking

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

*डाॅ.आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील हायस्कूल जांभळी मधिल स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी केली जांभळीत स्वच्छता मोहीम*




 शशिकांत घाटगे : जांभळी प्रतिनिधी   

  

   स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राज्यात राबविला जात आहे .यामध्ये स्वच्छता ही सेवा या भावनेतून श्रमदान करून हे अभियान प्रत्येक गावात  राबविण्यात येत आहे.

 या अभियानाच्या माध्यमातून डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील हायस्कूल जांभळी मधील स्काऊट गाईड विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्याकडून जांभळी गावात स्वच्छता मोहीम शनिवार दि.18/09/2021 रोजी राबवण्यात आली.

     


या शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी ग्रामपंचायत परिसर, प्राथमिक शाळा परिसर ,गावातील बस स्थानक परिसर व विकास मंदिर परिसर या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.

     सदर हायस्कूलचे विद्यार्थी हे राष्ट्रपती पुरस्कार, राज्यपाल पुरस्कार तसेच सलग तिसऱ्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील बेस्ट स्काऊट गाईड प्राप्त शाळा आहे. हायस्कूलच्या माध्यमातून  जांभळी गावात वृक्षारोपण, ऊरूस यात्रा बंदोबस्त व विविध उपक्रम राबविले जातात. 

      यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते स्काऊट शिक्षक शाम पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले तर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ पिसाळ मॅडम व सर्व स्टाफ, संस्थेचे चेअरमन मा. गणपतराव पाटील दादा तसेच सर्व संचालक,सरपंच ,सर्व सदस्य, व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

   स्वच्छता मोहीम राबवून राष्ट्रीय सेवा केल्याबद्दल स्काऊट गाईडच्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा