Breaking

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर; राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

संग्रहित छायाचित्र


     कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर पडली आहे. राधानगरी धरणक्षेत्रात पावसाचा जोर असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. जिल्ह्यातील एकूण 21 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सर्वात जास्त पाऊस गगनबावडा येथे झाला आहे. हा पाऊस भात पिकासाठी जरी चांगला असला तरी इतर पिकांना याचा मोठा फटक बसणार आहे.


तालुकानिहाय पाऊस...


गगनबावडा सर्वाधिक ६४.५ मिमी हातकणंगले- ४.४, शिरोळ २.७, पन्हाळा- १४.२, शाहूवाडी- ४९, राधानगरी ३५.३, गगनबावडा- ६४.५, करवीर- ९.३, कागल- ८.४, गडहिंग्लज १०, भुदरगड- १०.८, आजरा - १५.६ व चंदगड- २६.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा