Breaking

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

कोल्हापुरात शॉर्ट सर्किटमुळे बसला आग, आगीत बस जळून खाक

 

Photo source-saamtv


कोल्हापूर: गांधीनगर, आज पहाटे बसमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एसटी बस (बस एम एच ०६ एस ८४१३) पूर्णपणे जळाली आहे. यात बसचे अंदाजे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. याबाबतची फिर्याद चालक किरण विश्वासराव पाटील यांनी गांधीनगर पोलिसांत दिली आहे.




     आज पहाटेच्या सुमारास सोलापूर ते कोल्हापूर रोडवर तावडे हॉटेलजवळ असताना मागील चाकाजवळ अचानकपणे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग वाढत जाऊन अख्ख्या बसने पेट घेतला. एकूण चार ते पाच लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला आहे.

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा