Breaking

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

परीक्षा विभागाची उत्कृष्ट कामगिरी; अभियांत्रिकी अंतिम परीक्षेचा निकाल दोन दिवसात जाहीर व इतर निकाल ही तात्काळ लावण्यासाठी कटिबद्ध : मा.गजानन पळसे,प्र.संचालक


गजानन पळसे, संचालक परीक्षा भाग

प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


      शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा या ऑनलाईन पध्दतीने सुरळीतपणे सुरु झाल्या आहेत. तसेच काही अभ्यासक्रमाचे निकाल दोन दिवसात जाहीर करून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

   आज दि.८ सप्टेंबर २०२१ रोजी विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा ही पार पडल्या.आजच्या या परीक्षेसाठी २९५४ विद्यार्थ्यांपैकी २८८९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली. ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण उद्भवू नये यासाठी तांत्रिक अडचणीचे निराकरण करणेसाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सॉफ्टवेअर पुरवठादार कंपनीची यंत्रणा  कार्यरत ठेवण्यात आली होती.

      आज दि.८ सप्टेंबर २०२१ रोजी खालील एकुण १८ परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले व आजपर्यंत एकूण ७३ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. आज घोषित करण्यात आलेल्या निकालापैकी बी.ई. अंतिम वर्ष सेमिस्टर ७ व ८ या परीक्षांचा निकाल अवघ्या दोन दिवसात घोषित करण्यात आलेला आहे. या परीक्षांच्या गुणपत्रिका उद्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना पोहोच होतील. तसेच यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या बी.फार्मसी व विधी अभ्यासक्रमांच्या निकालांच्या गुणपत्रिका देखील संबंधित महाविद्यालयांना वितरित करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा जे विद्यार्थी परदेशात पुढील उच्च शिक्षणासाठी जाणार आहेत किंवा नोकरीसाठी ज्यांना गुणपत्रिकेची आवश्यकता आहे, अशा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केलेले काम उत्कृष्ट असल्याची प्रतिक्रिया संबंधित घटक व परीक्षार्थी विद्यार्थ्याकडून दिली जात आहे.

आज निकाल घोषित केलेले अभ्यासक्रम :


 १) एम.ए. फिलॉसॉफी सेमि ३ व ४


२)एम. एस्सी. शुगर टेक्नॉलॉजी सेमि ३ व ४


३) बी.ए. ड्रेस मेकिंग अॅन्ड फैशन कोआर्डिनेशन सेमि-३ व ४


४) बी.ई. सेमि ७ व ८


५) सर्टिफिकेट कोर्स इन फ्रेंच लॅग्वेज   सेमि १ व २


६) एम.एस्सी. अॅनॅलिटीकल केमिस्ट्री सेमि ३ व ४


७) एम.एस्सी. इन औरंगनिक केमिस्ट्री सेमि ३,६ व ४


८) बी.आर्किटेक्चर सेमि ८ व १०


९) बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स सेमि ५ व ६

    दि.१० ऑगस्ट २०२१ पासून उन्हाळी सत्रातील परीक्षा ऑनलाईन पध्दतीने सुरू आहेत. तथापि ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना काही तांत्रिक कारणास्तव दि.१० ऑगस्ट २०२१ पासून सुरु झालेल्या परीक्षापैकी त्यांची परीक्षा देता आलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा न देवू शकलेल्या पेपरची माहिती / तपशिल खालील लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने संगणक प्रणालीमध्ये सादर करण्यात यावी. सदरची लिंक ही दि.६ ते ९ सप्टेंबर २०२१ या कालावधीपूरतीच खुली करण्यात आलेली आहे, याची नोंद विद्याथ्र्यांनी घेण्याची आहे.


unishivaji.ac.in / online.unishivaji.ac.in या वेबसाईट पोर्टलवर -


Link-: Application for re-examination March / April 2021

       तसेच अद्याप ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु झालेली नाही त्यांनी मॉक टेस्ट सत्वर द्यावी म्हणजे मुख्य परीक्षेत तांत्रिक अडचणी येणार नाहीत, तसेच विद्यापीठामार्फत देण्यात येणा-या अधिकच्या सूचना विद्यार्थ्यांना त्वरित समजता याव्यात यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ, स्वतःचा ईमेल तसेव नोंदणीकृत मोबाईल वारंवार पाहून पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री गजानन पळसे यांनी महाविद्यालयास केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा