![]() |
सुनील कांबळे, हरोली |
*प्रा.चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
आपण स्वावलंबी बनण्याचे अनेक यशस्वी गोष्टी ऐकला असाल पण सध्या हरोली मुक्कामी असणारा मात्र मुळचा बस्तवाडचा सुनील भूपाल कांबळे याला जन्मतः अपंगत्व होते. त्याचे दोन्ही पाय लुळे आहेत. जय हिंद न्यूजशी बोलताना म्हणाले की, लहानपणा पासूनच मनामध्ये वाटायचं की माझ्या बरोबरचे सर्व मित्र खेळतात ,घरात मदत करतात पण माझ्या वाटयाला एवढे मोठे अपंगत्व , दोन्ही पाय लुळे ,चालता ही येत नाही यामुळे खूप दुःख होत होते.
पण आपल्याकडे जे नाही याचे दुःख घेण्यापेक्षा जे आहे त्याचा वापर करून जगुया असा निर्धार केला व स्वावलंबी जीवन जगण्यास सुरुवात केली. त्यानी सायकल पंक्चर व दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. व स्वतः राबून कुटुंबातील सर्व जबाबदारी स्वीकारली.यासाठी ते दररोज हरोली ते नृसिंहवाडी तीन चाकी सायकलने दोन्ही हाताचा उपयोग करून प्रवास करत असतात. ते सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दररोज श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आपला व्यवसाय करून दररोज ₹ 500 कमवतात व या सर्व कष्टात ते समाधानी असतात. विशेष म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असते.यांच्याकडे बघून सुशिक्षित लोकांनी सुद्धा आत्मनिर्भर बनण्याची इच्छा प्रकट करतात व परिस्थितीचे कारण न देता आलेल्या अडचणींवर मात करत आपण परिस्तिथीला धैर्याने तोंड दिले पाहिजे व ते बळ आपल्यात असते. फक्त आपण ते ओळखुन लढले पाहिजे असे म्हणतात.
अपंगत्वावर मात करीत त्यांचा कष्टाचा व रोजी रोटीचा दिनक्रम सुरू असतो. त्यांच्या या स्वावलंबी कार्याला जय हिंद डिजिटल न्यूज परिवाराच्या वतीने सलाम !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा