![]() |
मा.गजानन पळसे,प्र.संचालक,परीक्षा विभाग |
*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील मार्च / एप्रिल 2021 उन्हाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. सदर परीक्षेवेळी ज्या विद्यार्थांना तांत्रिक कारणास्तव परीक्षा देता आलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या लिंकद्वारे नोंदणी करण्याबाबत आवाहन करण्यात आलेले होते.
ज्या विद्यार्थ्यांनी पुर्नपरीक्षेसाठी नोंदणी केली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांच्या खालील अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या प्रारंभ तारखा खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.👇👇
🔴 पदवी अभ्यासक्रम 👇
B.Com / BBA / BCA, B.Sc, B.Tech, BSW, B.Voc.,BOD/BID/BDS 👇
👉🏼 पुर्नपरीक्षा प्रारंभ तारीख : दि.16/09/2021
🔴 पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम 👇
BA ,MA, M.Com, M.Sc., MSW & MCA
👉🏼 पुर्नपरीक्षा प्रारंभ तारीख : दि.21/09/2021
उपरोक्त अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सदरचे परिपत्रक सर्व संबंधीत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे अशा प्रकारची माहिती मा.गजानन पळसे प्र. संचालक (परीक्षा व मूल्यमापन मंडळ) यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा