Breaking

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

चंद्रकातदादा पाटील यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार : नामदार हसन मुश्रीफ

 

नामदार हसन मुश्रीफ


    महाराष्ट्रातील जवळपास अकरा मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून शेवटी भ्रष्टाचाराचा आरोप नामदार हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला.भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केला आहे.या जिव्हारी लागणाऱ्या आरोपानंतर  नामदार हसन मुश्रीफ यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन सोमय्या आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. सोमय्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. तसेच चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

     हसन मुश्रीफ म्हणाले, भाजप सत्तेत असताना चंद्रकातं पाटील यांनी घोटाळे केले आहेत. रस्ते घोटाळ्या प्रकरणी चंद्रकातदादा पाटील यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करणार आहे. त्याबाबतचे पुरवा देणार आहे. चंद्रकांत पाटील यांच धाडस झालं नाही म्हणून त्यांनी किरीट सोमय्यांच्या खाद्यावर बंदूक ठेवली. असा आरोप त्यांनी केला.

    दरम्यान, मी 17 वर्ष मंत्री आहे. माझ्यावर कधीच कोणता आरोप झाला नाही. उलट तुमच्या काळात अनेक घोटाळे झाले, असं म्हणत किरीट सोमय्यांवर मी 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

     सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राज्याच्या विकासापेक्षा आमचा पक्ष व आम्ही किती श्रेष्ठ आहोत या आरोप- प्रत्यारोपांच्या फेऱ्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे हे मात्र महाराष्ट्रातील जनता लक्षात घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा